-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 1
/
202409061600431610.pdf.mr.txt
63 lines (63 loc) · 9.35 KB
/
202409061600431610.pdf.mr.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
# Page 1
अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे व
कामगार उप आयुक्त, पुणे या कार्यालयासांठी
खाजगी जागा भाडेतत्तवावर घेण्यासाठी
प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत..
महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांकः अर्थसं-२०२२/प्र.क्र.२२६/कामगार-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२४
संदर्भ :-
१.शासन निर्णय क्रमांक अर्थसं-२०१९/प्र.क्र.१६०/कामगार-८, दि.१३.१२.२०२१
२.शासन निर्णय समक्रमांक दि.०९.०१.२०२३.
३.कामगार आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र.आस्था/२०२४/पुणे-भाडे करारनामा/
कार्या-३/७६४, दि.०३.०९.२०२४.
प्रस्तावना:
अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे या कार्यालयाची वाकडेवाडी, शिवाजीनगर,
पुणे येथे असलेली जुनी इमारत पाडून त्या शासकीय जागेवर नवीन इमारत बांधण्याच्या
प्रस्तावास संदर्भ क्र. १ येथील दि.१३.१२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय
मान्यता प्रदान करण्यात आलेली असून, सदर शासकीय जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम
सुरु असल्याने अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग व कामगार उप आयुक्त कार्यालय, पुणे ही
दोन्ही शासकीय कार्यालये दि.०१.०३.२०२३ पासून शक्ती चेंबर्स, स.नं. ७७/१, २ रा, ३ रा व ४
था मजला, संगमवाडी, पुणे या भाडेतत्तवावर घेण्यात आलेल्या खाजगी जागेत स्थलांतर
करण्यात आली आहेत.
२. सदर खाजगी इमारतीतील दुसरा, तिसरा व चौथा मजला येथील ८१०५ चौ.फूट
इतकी जागा दि.०१.०३.२०२३ ते दि.२९.०२.२०२४ या कालावधीसाठी भाडेतत्तवावर घेण्यास व
सदर जागेचे भाडे अदा करण्यास संदर्भ क्र. २ येथील दि.०९.०१.२०२३ रोजीच्या शासन
निर्णयान्वये प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली होती. सदर करारनाम्यामध्ये प्रतिवर्षी भाडे
रकमेच्या ५% वाढ प्रस्तावित करण्यात आली होती.
३. तथापि, वाकडेवाडी, पुणे येथील शासकीय जागेवर सुरु असलेल्या अपर कामगार
आयुक्त, पुणे कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास अजून २ वषांचा कालावधी
लागणार असल्याने, उक्त नमूद दोन्ही कार्यालयांसाठी शक्ती चेंबर्स, संगमवाडी, पुणे या
खाजगी इमारतीतील उक्त नमूद जागा दि.०१.०३.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ या
कालावधीकरिता भाडेतत्तवावर घेण्याबाबत अपर कामगार आयुक्त, पुणे यांनी सदर इमारतीचे
मालक गेरा होच्ल्डग प्रा.लि. यांचेसोबत केलेल्या भाडे करारनाम्यास व सदर जागेच्या
भाड्यापोटी अदा करावयाच्या रकमेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची विनंती कामगार
# Page 2
शासन निर्णय क्रमांकः अर्थसं-२०२२/प्र.क्र.२२६/कामगार-८
आयुक्त, मुंबई यांनी संदर्भ क्र. ३ येथील दि.०३.०९.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास केली
आहे. त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय:-
कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेंतर्गत अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग,
पुणे व कामगार उप आयुक्त, पुणे या कार्यालयांस स.नं.७७/१, शक्ती चेंबर्स, संगमवाडी, पुणे
या इमारतीमधील दुसरा, तिसरा व चौथा मजला येथील एकूण ८१०५ चौ.फूट जागा
दि.०१.०३.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ या कालावधीतकरिता भाडे तत्तवावर घेण्यासाठी अपर
कामगार आयुक्त, पुणे यांनी दि.१९.०४.२०२४ रोजी नोंदित केलेल्या इमारत भाडे
करारनाम्यास व उक्त नमूद जागेच्या भाड्यापोटी प्रतिमाह रु.२,११,८९९/- (१८% वस्तू व
सेवा कर वगळून) याप्रमाणे रु.२५,४२,७८८/- (१८% वस्तू व सेवा कर वगळून) इतके वार्षिक
भाडे अदा करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.
तद्नंतर वरील नमूद कार्यालयांच्या आवश्यकतेनुसार शासकीय इमारत उपलब्ध होत
नाही तोपयंत टप्प्याटप्प्याने शासन मान्यतेस मुदतवाढ देण्यात येईल.
२. उपरोक्त प्रयोजनासाठी होणारा खर्च मागणी क्र. “के-४, २२३० कामगार व सेवायोजन
(०१) कामगार (००१) संचालन व प्रशासन (००) (०१) कामगार उप आयुक्त (प्रादेशिक) (२२३०
०४२३) १४-भाडेपट्टी व कर” या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या मंजूर
अनुदानातून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका, १९७८, भाग-पहिला,
उपविभाग-एक मधील अ.क्र.१० समोरील नियम क्रमांक ११५ आणि महाराष्ट्र आकस्मिक खर्च
नियम, १९६५ मधील नियम १४७ (क) अन्वये कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यास व भाडे
प्रदान करण्यास मंजूरी देण्यास प्रशासकीय विभागास असलेल्या अधिकाराचा वापर करुन
निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
# Page 3